‘या’ आहेत भारतातील काही सुप्रसिद्ध ‘वर्ल्ड हेरीटेज साईट्स’

taj
भारतामध्ये ‘वर्ल्ड हेरीटेज साईट’ चा दर्जा मिळालेल्या एकूण ३६ वास्तू आहेत. यामध्ये जगातील सात आश्चर्याच्या पैकी एक असेलल्या, आग्रा येथे असलेल्या ताजमहालाचा समावेश आहे. तसेच सोळाव्या शतकामध्ये मुघल शासनाच्या काळामध्ये बांधाविलेल्या आग्रा फोर्टचा ही यामध्ये समावेश आहे. हम्पी येथील प्राचीन कालीन मंदिर संकुलाला देखील युनेस्को तर्फे ‘वर्ल्ड हेरीटेज साईट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. दक्षिण भारतामध्ये चौदाव्या ते सोळाव्या शतकामध्ये आधिपत्य असलेल्या विजयानगर वंश कालीन मंदिरे आणि महालांचे अवशेष या ठिकाणी आजही उभे आहेत.
HILL-FORTS-OF-RAJASTHAN
ओरिसा राज्यातील सुप्रसिद्ध कोणार्कचे सूर्यमंदिर वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित करण्यात आले असून, तेराव्या शतकामध्ये बनविण्यात आलेले हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे. भव्य रथाच्या आकारामध्ये बनविलेल्या या मंदिराला बारा रथचक्रे असून, हा रथ ओढणारे सात घोडेही येथे पहावयास मिळतात. या मंदिराच्या आवारामध्ये अतिशय सुरेख कोरीवकाम केलेल्या अनेक देवतांच्या पाषाणमूर्ती पहावयास मिळतात. राजस्थान येथे पाचव्या ते अठराव्या शतकाच्या काळादरम्यान बनविल्या गेलेल्या पाच किल्ल्यांना वर्ल्ड हेरीटेज साईटचा दर्जा देण्यात आला आहे. यांमध्ये जैसलमेर फोर्ट, कुंभलगड फोर्ट, अजमेर फोर्ट, चित्तोडगड फोर्ट, रणथंबोर फोर्ट या किल्ल्यांचा समावेश आहे.
MONUMENTS-AT-HAMPI
अकराव्या शतकामध्ये राणी उदयमती यांनी त्यांचे पती राजा भीमदेव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गुजरात येथील पाटणच्या जवळ बांधविलेली ‘रानी की वाव’ ही बाव (आत उतरून जाण्यासाठी पायऱ्या असलेली विहीर) वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित करण्यात आली आहे. ही बाव सात मजली असून, या बावेमध्ये अनेक सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. ख्रिस्तपूर्व पहिल्या आणि दुसऱ्या शतकच्या दरम्यान बांधलेले सांचीचे बौद्ध स्तूप आणि मंदिरांनाही वर्ल्ड हेरीटेज साईटचा दर्जा देण्यात आला आहे. या संकुलामध्ये असलेल्या सुंदर बौद्ध धर्मशाला, प्रार्थनागृहे, मंदिरे आणि स्तूप येथील आकर्षण असून, बाराव्या शतकापर्यंत हे स्थान बौद्धधर्मियांचे प्रमुख केंद्र होते. या वास्तूंच्या बरोबर अजंता एलोरा केव्ह्ज, गोव्यातील काही प्राचीन चर्चेस, दिल्ली येथे असलेले हुमायूनचे स्मारक, महाबलीपुरम येथे असलेली मंदिरे यांनाही युनेस्को तर्फे वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Leave a Comment