Video : विसर्जनाच्या मिरवणुकीत रूग्णवाहिकेला दिला रस्ता, नेटकऱ्यांनी केले पुणेकरांचे कौतूक

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या उत्साहात गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पुण्यात तर गणपती विसर्जनाचा दिवस आणखीनच खास असतो. मात्र याच विसर्जनादरम्यानच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान रूग्णवाहिका अडकली. मात्र क्षणात लोकांनी मिरवणूक थांबत रूग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता दिला.

लक्ष्मी रोडवर गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू होती. हजारो लोकांनी यावेळी रस्ता खचाखच भरला होते. मात्र रूग्णवाहिकेचा आवाज येताच सर्व भक्तांनी रस्त्याच्या कडेला होत रूग्णवाहिकेला जाण्यासाठी जागा करून दिली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, युजर्सकडून भक्तांचे कौतूक केले जात आहे.

एका युजरने लिहिले की, माझा देश बदलेले, जेव्हा आपण सर्व बदलू आणि आपण सर्व बदलत आहोत. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, भक्तांनी खरचं चांगले काम केले.

 

Leave a Comment