आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बॉलिवूड कलाकार वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात. बॉलिवूड कलाकार हे त्याच्या स्वत:च्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आलिया भट्टनेही काहीच दिवसांपूर्वी आपले यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. आता अभिनेत्री दिशा पटणीनेही तिच्या पाठोपाठ आपले यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. तिने तिचा पहिला व्हिडिओ देखील यावर शेअर केला आहे.
या चॅनेलच्या माध्यमातून दिशा तिचे वर्कआऊट सेशन, फिटनेस फंडे, तिची दैनदिन शैली, फॅशन टीप्स, याबाबत संवाद साधताना दिसणार आहे. तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन तिच्या यूट्यूब चॅनलबद्दलची माहिती शेअर केली आहे.
दिशा पटणी यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून देणार फिटनेस धडे
Can’t wait to share my first YouTube video with all of you. I hope you all enjoy watching it as much as I did filming it. Have tried shooting it as candid, raw and personal. Amateur at it but showcasing my real self to all of you❤️ pic.twitter.com/hjFswddyih
— Disha Patani (@DishPatani) September 13, 2019
काही दिवसांपूर्वीच ‘भारत’ चित्रपटात दिशा झळकली होती. ती आता तिच्या आगामी ‘मलंग’ चित्रपटाची तयारी करत आहेत. मोहित सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू हे देखील तिच्यासोबत या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी ‘व्हॅलेन्टाईन डे’ला प्रदर्शित होईल.