Video : टेस्ला सुसाट धावत असताना निवांत झोपला होता ड्रायव्हर, बघा पुढे काय झाले

मॅसेच्युसेट्समधील एका व्यक्तीने सोशल मीडियवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ बघून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. टेस्ला कार चालवणाऱ्या ड्रायव्हरला अचानक झोप लागली.मात्र तरीही कार ताशी 90 किमी वेगाने धावत होती.

टेस्ला ही ऑटो पायलेट फंक्शन कार आहे. मात्र कंपनीने स्पष्ट केले आहे की, कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी ड्रायव्हरने सतर्क राहणे गरजेचे आहे.

डाकोट रॅनडाल या व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. तो रस्त्यावरून जात असतानाच अचानक बाजून टेस्ला कार गेली. त्याने गाडीत बघितल्यावर ड्रायव्हर आणि महिला पँसेंजर निवांत झोपेत होते. दोघांना ही गाडीची काहीही काळजी नव्हती.

हा व्हिडीओ न्यूटनच्या मॅसेच्युसेट्स टर्नपाइक येथे रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. रॅनडॉलने सांगितले की, गाडी जवळपास ताशी 90 ते 95 च्या वेगाने धावत होती. तो हॉर्न मारून ड्रायव्हरला उठवण्याचा प्रयत्न करत होता.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, आतापर्यंत तब्बल 6 लाखांपेक्षा  अधिक लोकांनी बघितला आहे. तर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment