Video : चालत्या गाडीतून पडले 1 वर्षांचे बाळ, बघा पुढे काय झाले

केरळमध्ये घडलेल्या एका घटनेने सगळ्यांनाच हैराण केले आहे. मुन्नार येथे एक लहान बाळ चालत्या कारमधून खाली पडले. मात्र त्या बाळाला वाचवण्यात आले असून, सुखरूप आई-वडिलांकडे सोपवण्यात आले आहे.

पर्यटन नगरी ओळख असलेल्या केरळमधील मुन्नर येथील सब इंस्पेक्टरला अचानक शनिवारी रात्री जंगलातील वॉर्डनचा अलार्म कॉल आला. वॉर्डनने सांगितले की, रस्त्याच्या मध्यभागी एक बाळ रांगताना दिसले आहे. एका चेक पोस्टजवळ हे बाळ अंधारात रांगताना सापडले. बाळाच्या डोक्याला इजा झाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, बाळ पडले त्यावेळी आई-वडिल आणि पुर्ण परिवार गाडीमध्येच होता. तामिळनाडूवरून ते देवदर्शन करून परतत होते. ज्यावेळी बाळ खाली पडले त्यावेळी संपुर्ण कुटुंब झोपेत होते. त्यांना माहित देखील नव्हते की, बाळ गाडीतून पडले आहे.

सब इन्सपेक्टरने सांगितले की, मला रात्री 9.40 ला अलार्म कॉल आला होता. 20 मिनिटात त्या बाळाला आम्ही शोधले. बाळावर उपचार करण्यात आल्या. त्यानंतर आम्हाला समजले की, 6 किलोमीटर लांबच्या एका पोलिस स्टेशनमध्ये बाळ हरवल्याची तक्रार करण्यात आली आहे. आम्ही त्या आई-वडिलांना बोलवून त्यांच्याकडे बाळाला सोपवले.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बाळ गाडीतून पडते व रस्त्यावर रांगत आहे.

 

Leave a Comment