राफेल नदालने जिंकले युएस ओपनचे विजेतेपद

स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदालने तब्बल 5 तास चाललेल्या लढतीत डॅनिल मेदवेदेवचा चौथ्यांदा युएस ओपन विजेतेपदावर नाव कोरले. याआधी त्याने 2010, 2013 आणि 2017 मध्ये युएस ओपन ग्रँडस्लॅमवर नाव कोरले आहे.

३३ वर्षीय नदालने ७-५,६-३,५-७, ४-६, ६-४ असा मेदवेदेवचा पराभव केला. आपल्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत राफेल 5 व्यांदा युएस ओपनच्या फायनलमध्ये पोहचला होता. त्याने सेमी फायनलमध्ये मातेओ बेरेतिनीचा 7-6 (8/6), 6-4, 6-1 असा पराभव केला होता.

नदालने मेदवेदेवचा पराभव करत 19 वे ग्रँडस्लॅम आपल्या नावावर केले. पाचव्या मानांकित रशियाच्या डॅनिल मेदवेदेव पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये खेळत होता. त्याने राफेलला कडवी झुंज दिली.

Leave a Comment