Video : रोलर कॉस्टरमध्ये राइड घेत असताना या व्यक्तीने हवेत झेलला फोन

स्पेनच्या पोर्ट एवेंचर वर्ल्ड थीम पार्कमध्ये अशी घटना घडली की, जे बघून सर्वचजण हैराण झाले आहेत. एक कपल रोलर कॉस्टर राइड करत होते. राइड करत असतानाच त्या व्यक्तीला हवेमध्ये आयफोन उडताना दिसला. ताशी 130 किलोमीटर वेगाने फिरणाऱ्या कॉस्टरमध्ये देखील त्या व्यक्तीने चक्क फोनला एका हाताने पकडले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

फोनचा कॅच पकडणाऱ्या व्यक्तीचे नाव सॅम्युअल कॅम्फ आहे. हा व्हिडीओ सॅम्युअलने स्वतःच रेकॉर्ड केला असून, युट्यूबवर या व्हिडीओला आतपर्यंत 48 लाखांपेक्षा अधिक व्यूज आले आहेत. तर हजारो लाइक्स आले आहेत.

सॅम्युअलने सांगितले की, फोनच्या मालकाला विश्वास बसत नव्हता की, मी फोन पकडला आहे. त्याने मला अलिंगन दिले. फोन पाहून तो भलताच खूष होता.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या देखील भन्नाट कमेंट्स आल्या. एक युजरने लिहिले की, खरचं शानदार व्हिडीओ आहे.

Leave a Comment