पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता बेली डान्सच्या भरोसे

डबघाईला आलेली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी पाकिस्तानच्या सीमा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (SCCI) अजरबैजान येथे एका गुंतवणूक शिखर संमेल्लनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क बेली डांसर्स नाचताना दिसल्या. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी पत्रकार गुल बुखारीने ट्विट करत लिहिले की, खैबर पख्तूनख्वामध्ये गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अजरबैजानची राजधानी बाकू येथे चार ते आठ सप्टेंबर दरम्यान शिखर संमेल्लनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुंतवणूकदारांसमोर बेली डांसर्स नाचताना.

आश्चर्य म्हणजे या गुंतवणूकदारांपैकी अनेकजण बेली डांसर्सचे फोटो देखील काढत होते.

सध्या पाकिस्तानच्या सरकारकडून ढासळलेली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. गाडी खरेदीपासून ते नवीन नोकऱ्यांपर्यंत अनेक गोष्टींवर पाकिस्तानमध्ये बंदी आणण्यात आली आहे. 201-19 मध्ये पाकिस्ताची वार्षिक वित्तीय तुट ही तीन दशकात सर्वाधिक वाढून 8.9 टक्क्यांवर गेली आहे.

Leave a Comment