दहशतवाद्यांनी उद्ध्वस्त केलेले गांधीजींचे पेटिंग या कलाकारांनी पुन्हा बनवले

काबुल येथील भारतीय दुतावासाच्या भिंतीवर पुन्हा एकदा महात्मा गांधी यांचे चित्र शांतीचा संदेश देताना झळकत आहे. मे 2017 मध्ये दहशतवाद्यांनी बॉम्ब स्फोटाने ही जागा उद्ध्वस्त केली होती. या हल्ल्यात 140 लोकांचा मृत्यू झाला होता. अफगाणिस्तानच्या आर्टलॉर्ड्स या कलाकारांच्या समुहाने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या आधी हे चित्र पुन्हा एकदा तयार केले आहे.

यावर गांधीजींचा संदेश इंग्रजी व फारसी भाषेत लिहिण्यात आलेला आहे. यावर लिहिण्यात आले आहे की, ज्या दिवशी प्रेमाची ताकत लालसेवर वरचढ ठरेल, त्या दिवशी जगाला शांतीचा संदेश व्यवस्थितरित्या समजेल. कलाकांराचे म्हणणे आहे की, गांधीजींना श्रध्दांजली देण्यासाठी हा योग्य मार्ग आहे. स्थानिक कलाकार ओमैद फरीदी, नेगीना अझिमी व इतर 5 कलाकारांनी मिळून तीन दिवस डिझाइन आणि दोन दिवस रंग देत  325 वर्गफुटाची पेटिंग बनवली आहे.

आर्टलॉर्ड्सचे प्रमुख ओमैद फरीदी यांच्यानुसार, अफागाणिस्तानची लोक गांधीजींच्या शांतीपुर्ण आणि अहिंसेच्या तत्वांची प्रशंसा करतात. येथे त्यांची ओळख शांतीसाठी नेहमी उभे असणारे व्यक्तीमत्त्व अशी आहे. ही ओळख कायम ठेवणे गरजेचे आहे. ही संस्था जगभरातील महिला कलाकारांना तेथे येण्यास आणि काम करण्यास प्रोत्साहन देते.

Leave a Comment