Video : भयानक अपघातात थोडक्यात बचावला फॉर्म्युला 3 ड्रायव्हर

इटलीतील मोझा सर्किट येथील पात्रता फेरी दरम्यान फॉर्म्युला 3 ड्रायव्हर अलेक्स पेरोनी अपघातात थोडक्यात बचावला. भयानक अपघातानंतरही अलेक्स बाहेर येथे चालत होता.

गाडी क्रॅश झाल्यानंतर हवेत उसळून, ट्रॅकच्या बाहेर जाऊन आदळली. मात्र सुदैवाने या अपघातात अलेक्स बचावला. काही दिवसांपुर्वीच अशाप्रकारच्या क्रॅशमध्ये रेसर एंथनी हबर्टाचा मृत्यू झाला आहे.

19 वर्षीय अलेक्सला या अपघातानंतर तपासणीसाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे मोंझा येथे होणाऱ्या रेस 2 मध्ये अलेक्स भाग घेणार नाही.

ड्रायव्हरला अडथळा निर्माण व्हावा यासाठी सौसेज कर्ब ( अडथळा निर्माण करण्यासाठी लावलेले दगड) बसवण्यात आले होते. अलेक्सच्या अपघाताननंतर सौसेज कर्ब किती धोकायदायक आहेत, ते पुन्हा एकदा समोर आले आहे. याघटनेनंतर ट्रॅकवरून हे कर्ब हटवण्यात आले आहेत.

 

Leave a Comment