येथे जाण्याचे धाडस कोणाचेच नाही !

hunted
या जगामध्ये अनेक ठिकाणे अशी आहेत, जिथे नकारात्मक शक्तींचा वास असल्याच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी गेल्यानंतर अनेकांना चित्रविचित्र अनुभवही आले आहेत, त्यामुळे या ठिकाणांच्या भोवती रहस्याचे गूढ वलय निर्माण झाले आहे. अश्या या ठिकाणांच्या यादीमध्ये कॅनडा येथील ‘द बांफ स्प्रिंग्ज’ या हॉटेलच्या आलिशान वास्तूचा समावेश करता येईल. या ठिकाणी अनेक चित्रविचित्र, रहस्यमय घटना घडून गेल्याच्या कथा ऐकावयास मिळतात. स्थानिक लोकांच्या नुसार या हॉटेलच्या ८७३ क्रमांकाच्या खोलीमध्ये एका परिवारातील सर्व सदस्यांची पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून या वास्तूमध्ये नकारात्मक शक्तीचा संचार झाला असल्याची कथा प्रसिद्ध आहे. या कथेनुसार आजही एका माणसाची सावली, येथे मुक्कामाला येणाऱ्या पाहुण्यांच्या खोलीची घंटी वाजविताना पाहिली गेली आहे.
hunted1
अटलांटिक महासागरातील बर्म्युडा ट्रँगलचे गूढ आजही वैज्ञानिकांना उकललेले नाही. या क्षेत्रामध्ये आकाशामध्ये उडणारी विमाने आणि समुद्रामध्ये असणारी जहाजे गूढ रित्या, कोणताही मागमूस न ठेवता गायब झालेली आहेत. या जहाजांचे आणि विमानांचे नेमके काय झाले याचा पत्ता आजतागायत लागू शकलेला नाही, तसेच या हरविलेल्या जहाजांवरील लोकांचेही पुढे काय झाले हे देखील रहस्यच होऊन बसले आहे. या ठिकाणी जहाजे आणि विमाने गायब का होत असावीत याचे अनेक अंदाज गेली कित्येक वर्षे लावण्यात येत आहेत. क्वचित या ठिकाणी गायब झालेली जहाजे अनेक वर्षांनंतर सापडली ही आहेत, पण या जहाजांना कोणत्याही प्रकारचे अपघात झाल्याचे किंवा हे जहाज नेमके कसे गायब झाले असावे हे सांगणारे कोणतेही पुरावे आजवर समोर आलेले नाहीत.
hunted2
इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये असलेली ‘हायगेट सेमिट्री’ नामक दफनभूमी आणि त्याच्या आसपासच्या परिसराशी निगडित अनेक कथा प्रचलित आहेत. या सर्व कथांमध्ये एक कथा विशेष प्रसिद्ध आहे. या कथेनुसार या दफनभूमीच्या परिसरामध्ये ‘व्हॅम्पायर्स’चा वावर असून, अनेकांनी या व्हॅम्पायर्सला प्रत्येक्षात पहिले असल्याचे ठामपणे सांगितले आहे. अमेरिकेतील नेवाडा येथील ‘एरिया ५१’ या ठिकाणाशी निगडित देखील अनेक रहस्ये आहेत. या ठिकाणी खरेतर काही दशकांपूर्वी गुप्त मिशन्ससाठी विमाने तयार करण्याचे काम होत असे. त्या दरम्यान अनेक चित्रविचित्र घटना येथे घडल्या असल्याचे म्हटले जाते. त्यानंतर हा परिसर संपूर्णपणे ओसाड झाला आहे.

Leave a Comment