चलानचा धसका घेत भाईजानची सायकलस्वारी !


देशभरात सध्या नव्या वाहतुक नियमांचीच चर्चा होत आहे. त्यातच आम्ही आपल्या चलानच्या अनेक बातम्या दिल्या आहेत. आता बॉलीवूड कलाकारांनी देखील या चलानचा धसका घेतल्याचे सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे दिसत आहे. पण तसे काही नाही आहे. कारण बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान सध्या ‘दबंग ३’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण, मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशात सायकलस्वारी करत शूटिंगचे लोकेशन सलमानने गाठले. रस्त्यावरील लोकांनाही यावेळी सलमानसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. भाईजाननेही त्यांच्यासोबत सेल्फी घेऊन सायकलस्वारीचा आनंद लूटला.


नुकतेच ‘दबंग ३’ चे जयपूर येथील शूटिंग पूर्ण झाले असल्यामुळे सध्या सलमान खान मुंबईत परतला आहे. या चित्रपटाचे काही शूटिंग हे मुंबईत होणार असल्यामुळे शूटिंग लोकेशनपर्यंत सलमान खान सायकलवरच पोहोचला होता. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सलमानने शेअर केलेल्या व्हिडिओवरही चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Leave a Comment