यामुळे 5 सप्टेंबरला साजरा केला जातो शिक्षक दिन


शिक्षकांचे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत त्याचबरोबर अन्य क्षेत्रात देखील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रगती करत असतो. भारतात प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. आपण अनेकवेळा बघितले असेल की, या दिवशी सर्व विद्यार्थी शिक्षकांप्रती आभार व्यक्त करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का शिक्षक दिन का साजरा केला जातो ? नसेल माहित तर, जाणून घेऊया की 5 सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा केला जातो.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म 5 सप्टेंबर रोजी झाला होता. त्यांच्या जन्मदिनानिमित्त स्मरणार्थ हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. हे महान राष्ट्रपती म्हणाले होते की, हे संपुर्ण जग एक विद्यालय आहे. जेथे काहींना काही शिकायला मिळत असते. सर्वपल्ली राधाकृष्णन् म्हणायचे की, जीवनात कधीही काही चांगले आणि ज्ञानवर्धक शिकायला मिळाले तर ते त्वरित आत्मसात करा.

एकदा राधाकृष्णन् यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा जन्मदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी विद्यार्थी त्यांची परवानगी घेण्यासाठी गेले तेव्हा राधाकृष्णन् म्हणाले की, माझा जन्मदिवस असा वेगळा साजरा करण्यापेक्षा शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अधिक आनंद होईल. त्यानंतरच 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे. 1962 मध्ये पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता.

सर्वपल्ली राधाकृष्णन् हे 1952 ते 1962 असे 10 वर्ष भारताचे उपराष्ट्रपती होते. त्यानंतर 1962 मध्ये ते देशाचे राष्ट्रपती झाले.

Leave a Comment