रस्त्यात स्टंट करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे सोशल मीडियात होत आहे कौतूक


एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून शाळेतील दोन विद्यार्थी या व्हिडिओमध्ये रस्त्यातच स्टंट करताना पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांचे लक्ष या व्हिडिओने वेधून घेतले असून जाशिका खान आणि मोहम्मद अजाजुद्दीन असे त्या व्हिडिओमधील मुलांची नावे आहेत.


आमचे ऑलिम्पिक विजेती नाडिया कोमेन्सीने कौतुक केले असल्याचे एकून मला खूप आनंद झाला. मी माझ्या आई-वडिलांना हे सांगितल्यानंतर ते देखील खूप खूश झाले. नाडिया कोमेन्सी सारखे भविष्यात मला जिम्नॅस्टिक्स बनायचे असल्याचे जाशिका म्हणाली. माझ्या डान्स प्रशिक्षकांना माझा अभिमान वाटावा, यासाठी मी काही करू इच्छितो. जर मला भविष्यामध्ये जिम्नॅस्टिक्स होण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच प्रयत्न करेल. पण डान्स करणे मी बंद करणार नसल्याचे मोहम्मदने म्हटले आहे.


या मुलांचे ऑलिम्पिक विजेती नाडिया कोमेन्सीनेही कौतुक केले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिनेदेखील हे खूप मस्त असल्याचे म्हटले आहे. नाडिया ही पाच वेळा ऑलम्पिक विजेती ठरली आहे. नाडिया कोमेन्सीने ट्विट केल्यानंतर, क्रीडामंत्री किरेन रिजिजू हे देखील या मुलांचा स्टंट पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांनी या मुलांमध्ये खूप प्रतिभा असून नाडिया कोमेन्सी हा व्हिडिओ ट्विट केल्याने मला आनंद झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या मुलांची भेट घेण्यासाठी आतूर असल्याचे रिजिजू यांनी म्हटले.

Leave a Comment