… आणि मुंबईच्या गगनचुंबी इमारतीमधून अचानक वाहू लागला धबधबा


मुंबईमध्ये जोरदार सुरू असल्यामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशातच दक्षिण मुंबईमधील एका बहुमजली इमारतीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या बहुमजली इमारतीवरून चक्क धबधबाचा वाहत आहे.  व्हिडीओ बघणाऱ्यांना देखील आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

40 सेंकदांच्या या व्हिडीओमध्ये दिसून येते की, 40 मजली इमारतीवर कृत्रिम धबधबाच निर्माण झाला आहे. व्हिडीओ काढण्यासाठी देखील लोकांनी गर्दी केली. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी जोक्स केले तर काहींनी ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले.

 

तसेच, व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या युजरने सांगितले की, इमारतीवरील वॉटर टॅक फुटल्याने ही घटना घडली आहे. पावसामुळे हे झालेले नाही.

https://twitter.com/jollywell/status/1169184804971016192

याशिवाय पावसामुळे मुंबईकरांचे हाल होत असून, हवामान खात्याने पुढील 24 तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, मुंबई पोलिसांनी जर गरज नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आव्हान देखील केले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment