Video : गाण्यातून हा पोलीस सांगत आहे वाहतुकीच्या नियमांचे महत्व


चंदीगडमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक खास गाणे म्हटले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून तुम्ही वाचू शकत नाही असेही गाण्यात म्हटले आहे.

चंदीगड पोलिसांच्या ट्रॅफिक विभागात सहायक उप निरिक्षक असलेल्या भुपिंदर सिंह यांनी हे खास गाणे गायले आहे. गाण्यामध्ये त्यांनी वाहतुकीचे नियम तोडू नका असे आवाहन केले आहे, असे केले तर मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागेल असे म्हटले आहे.

#Awareness

A new song sung by ASI Bhupinder Singh on changes of fine in violating the traffic rules.#ObeyLaw#DriveSafe#WeCareForYou

Posted by Chandigarh Traffic Police on Monday, September 2, 2019

चंदीगड ट्रॅफिक पोलिसांनी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 28 हजार जणांनी पाहिला आहे.

गाण्यात पोलिस युवकांना सांगत आहे की, 18 वर्षांच्या पुर्वी गाडी चालवू नका, अन्यथा उल्लंघन केल्यामुळे तुमचे आई-वडिल अडचणीत येऊ शकतात.

युजर्सनी देखील त्यांच्या या गाण्याचे कौतुक केले. युजर्सनी खुप चांगले आणि अर्थपुर्ण गाणे आहे, असे म्हटले.

Leave a Comment