या हॉलीवूड चित्रपटाने रचला इतिहास


व्हेनिस फिल्म फेस्टीव्हलमध्ये नुकतेच जोकर या हॉलिवूड चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले. त्याचबरोबर या चित्रपटाने इतिहास रचला असून या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा रिलीज झाला, तेव्हा तो प्रत्येकाने श्वास रोखून पाहिला. जोकिन फोयनिक्स या अभिनेत्याने साकारलेला जोकर पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. विशेष म्हणजे या चित्रपटाला प्रेक्षकांनी सलग ८ मिनिटे उभे राहून कौतूक केले.

अभिनेता जोकिन फोयनिक्स हा क्षण पाहून भारावून गेला होता. चित्रपटाच्या इतिहासातील असा जोकर व्हिलन खळबळ उडवून देणारा होता. जोकर पाहून जगभरातील प्रत्येक समिक्षकांनी आपल्या उत्तम प्रतिक्रिया दिल्या आहेत. जोकर चित्रपट हा असा चित्रपट आहे, की ज्यामुळे कलाकारांची कारकिर्द, भूमिका, व्यक्तिरेखा यांना कलाटणी मिळू शकते.


चित्रपटाला व्हेनिस फिल्म फेस्टीव्हलला मिळालेल्या प्रतिसादानंतर, विशेषतः ८ मिनिटांच्या कौतुकानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता जगभरातील प्रेक्षकांच्या मनात ताणली गेली आहे.

Leave a Comment