… म्हणून त्याने भर रस्त्यात पेटवली जीप, व्हिडीओ व्हायरल


गुजरातमधील राजकोटमध्ये एका जीप मालकाला आणि त्याच्या मित्राला भर रस्त्यात जीप पेटवून दिल्याने अटक करण्यात आली आहे. टिकटॉक सारख्या अपवर देखील या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, गळ्यात सोन्याच्या चैनी घातलेला एक माणूस गाडीवर पेट्रोल टाकून पेटवून देतो.

गाडी पेटवणाऱ्या व्यक्तीचे नाव इंद्रजीतसिंह जडेजा असून, निमेश गोयल या त्याच्या मित्राने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. राजकोटच्या कोठारिया रोडवर ही घटना घडली.

दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, जडेजा हा ऑटोपार्ट्स विक्रेता असून, अनेकवेळा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही गाडी सुरू न झाल्याने वैतागून त्याने गाडी पेटवून दिली.

पोलिसांनुसार, दोन्ही आरोपींनी टिकटॉकसाठी हा व्हिडीओ बनवला नव्हता. मात्र व्हिडीओ शूट केल्यानंतर गोयलने त्याच्या अनेक मित्रांना हा व्हिडीओ पाठवला. त्यानंतर कोणीतरी पंजाबी गाणे टाकत हा व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केला. सध्या दोघेही जामीनावर बाहेर आहेत.

Leave a Comment