ताशी 500 किमी वेगाने धावत बुगाटीने रचला विश्वविक्रम


बुगाटीची शानदार स्पोर्ट्स कार शिरॉनने एक नवीन विश्व विक्रम केला आहे. मॉडिफाइड बुगाटी शिरॉनने ताशी 490.48 किलोमीटर वेगाने धावत जगातील सर्वात वेगवान कारचा विक्रम नावावर केला आहे. याच बरोबर ही पहिली कार आहे जिने ताशी 480 किलोमीटर पेक्षाही वेगाने धावण्याचा विक्रम केला आहे. बुगाटी शिरॉनने जर्मनीमध्ये हा विक्रम केला.

बुगाटी शिरॉनने मॉडिफाइड मॉडेलमध्ये हा विक्रम केला आहे. यासाठी कारमध्ये अनेक बदल करावे लागले. शिरॉनचे हे मॉडेल स्टँडर्ड मॉडेल पेक्षा 25 सेमी लांब आहे. या कारच्या मागच्या बाजूला एअरोडायनॅमिक्स अधिक चांगले करण्यासाठी क्रॉस सेक्शन कमी केले आहे. मॉडिफाइड शिरॉनमध्ये नवीन एग्जॉस्ट सेटअप देण्यात आले आहे. कारचा वेग वाढवण्यासाठी कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

इंटेरिअरबद्दल सांगायचे तर, 2 सीटर हायपरकारचे दुसरे पॅसेंजर सीट काढण्यात आले आहे. या जागी कॉम्प्यूटर सिस्टम लावण्यात आली आहे. तसेच ड्रायव्हरच्या सुरक्षेसाठी अनेक गोष्टीत बदल करण्यात आला आहे.

हा विक्रम करणाऱ्या शिरॉन कारमध्ये  8.0-लीटर, क्वॉड-टर्बो, W16 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 1,578 बीएचपी पॉवर जनरेट करते. स्टँडर्ड कारच्या तुलनेत याचे पावर 100 बीएचपी जास्त आहे.

Leave a Comment