बहिणीच्या गणेश विसर्जनात भाईजानचा हटके डान्स !


सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम सुरु असून सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. मोठ्या भक्तिभावाने या कलाकारांकडून गणपतीची सेवा केली जाते. अभिनेता सलमान खानचाही याच कलाकारांमध्ये समावेश होतो. सलमान खानची बहिण अर्पिता हिच्या घरी यंदा गणपती विराजमान झाले होते. मंगळवारी दीड दिवसाच्या या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पण सोशल मीडियात विसर्जन मिरवणुकीत सलमान खानने केलेला डान्स व्हायरल झाला आहे. सलमान खान या मिरवणुकीत एकदम हटके अंदाजात नाचताना दिसतो आहे.


सलमान खान याच्यासोबत अर्पिताच्या घरातून मिरवणूक निघाल्यावर स्वरा भास्कर, डेजी शहा हे सुद्धा नाचत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एकदम मोकळेपणाने सलमान खान ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरताना या व्हिडिओत दिसत आहे. सलमान खान याने यावेळी गणपती बाप्पाची आरती केली. त्याच्यासोबत यावेळी त्याचा भाचा देखील होता.


सलमान खानच्या नाचण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केले आहेत. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनी लाईकही केले आहे.

Leave a Comment