समुद्रात सापडला ‘एलियन’ सारखा दिसणारा जीव, व्हिडीओ व्हायरल


इंटरनेटवर अनेक विचित्र जीव-जंतूंचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक विचित्र जीव अमेरिकेच्या अलास्काच्या तटावर बघायला मिळाला आहे. अँगलर सारा वासेर-अल्फ़ोर्डने या विचित्र प्राण्याचा व्हिडीओ अपलोड केला असून, आतापर्यंत हा व्हिडीओ 10 लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. अनेकांनी या जीवाला विचित्र म्हटले आहे तर काहींनी एलियन असल्याचे म्हटले.

अँगलर सारा वासेर-अल्फोर्डने अलास्काच्या प्रिंस ऑफ वेल्स आयलँडच्या तटावर या प्राण्याचा व्हिडीओ बनवला आहे.

Crazy deep sea creature! Actually called a Basket Star. Prince of Wales Island Alaska. And yes it was placed back in the water unharmed.

Posted by Sarah Vasser-Alford on Thursday, August 15, 2019

अल्फोर्डने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसून येते की, झाडांच्या मूळाप्रमाणे असलेला हा जीव कशाप्रकारे हालत आहे. त्याच्या रक्तवाहिन्या देखील स्पष्ट दिसत असून, हा व्हिडीओ पाहून युजर्स देखील हैराण झाले आहेत.

युजर्सनी हा पृथ्वीवर राहणारा एलियन असल्याचे म्हटले आहे. तर काही युजर्सनी अल्फोर्डला या जीवाला पाण्यात सोडण्यास सांगितले. तर काही जणांनी हा जीव बास्केट स्टार असल्याचे म्हटले आहे.

अल्फोर्डने नंतर स्पष्ट केले की, हा जीव बास्केट स्टार असून, त्याला पुन्हा पाण्यात सोडण्यात आले आहे. बास्टेक स्टार एकप्रकारे झाडाची प्रजाती असून, जी स्टारफिश प्रमाणे दिसते. हे जीव समुद्र किनारी राहतात.

Leave a Comment