Video : बंदूक घेऊन चोर समोर उभा असतानाही तळीराम आपल्या कार्यात व्यस्त


सर्वसाधारणपणे जेव्हा कोणी चोरी करण्यासाठी बंदूक घेऊन आत घुसतो, त्यावेळे तेथे असलेले सर्वच जण घाबरतात. मात्र अमेरिकेतील सेंट लुइस येथे एक विचित्रच घटना बघायला मिळाली. सेंट लुइस येथील एका बारमध्ये चोरी करण्यासाठी एक व्यक्ती बंदुक घेऊन आत घुसला. यावेळी त्या दरोडेखोराला बघून बारमधील सर्वजण घाबरले आणि खाली लपले. मात्र एक माणूस बंदुक घेऊन आत घुसलेल्या चोराला बघूनही घाबरला नाही व निंवातपणे बसून दारू पीत होता.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. टोनी टावर असे या व्यक्तीचे नाव असून, 28 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. चोर आत घुसल्यानंतरही टोनी शांतपणे बसून मोबाईल वापरत होता. चोर पैसे शोधत असताना, त्याच्यासमोर सिगरेट पेटवत, दारूही पीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते.

Posted by John Kimack on Wednesday, August 28, 2019

दरोडेखोराला अटक करण्यात आली असून, त्याचे नाव केवीन मुरे आहे. दरोडेखोर टोनीच्या हातातील मोबाईल देखील हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र टोनी फोन देण्यास नकार देतो.

टोनी म्हणाला की, बदुंकीच्या जोरावर साउथ सिटीमध्ये नियत्रंण ठेवणाऱ्या, गुंडागर्दी करणाऱ्या लोकांना मी कंटाळलो आहे. मी काही घाबरलो नाही. उलट मला चांगले वाटले की, दरोडेखोर केवळ पैशांसाठी आला होता, त्याने कोणालाही इजा पोहचवली नाही.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, आतापर्यंत 90 हजारपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे.

Leave a Comment