5 इंचाच्या अंगठ्यामुळे टिक-टॉक स्टार बनला हा मुलगा


टिक-टॉक हे शॉर्ट व्हिडीओ अॅप अनेक कारणांमुळे चर्चेत असते. टिक-टॉकमुळे अनेक स्टार देखील निर्माण झाले आहेत. असाच एक मुलगा सध्या टिक-टॉकमुळे चर्चेत आला आहे. मॅसाच्युसेट्स येथील वेस्टपोर्टमधील एका विद्यार्थ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडीओ विहीयरल होण्यामागील कारण हे सिंगिंग किंवा एक्टिंग नाही तर या मुलाचा 5 इंचचा अंगठा आहे. या विद्यार्थ्याचे नाव जैकब पीना आहे. त्याची बाकीची बोट सर्वसामान्य माणसांप्रमाणेच आहेत, मात्र अंगठा तब्बल 5 इंच आहे.

या अंगठ्यामुळे जैकबचे टिकटॉकवर 1 लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. त्याच्या अंगठ्याची उंची ही कोकच्या कॅन एवढी आहे. लांबी बॉलपेन एवढी आहे. 20 वर्षीय जैकबला देखील त्याचा अंगठा एवढा लांब कसा याचे कारण माहित नाही.  त्याने सांगितले की, त्याला देखील हे विचित्रच वाटते.

त्याचा हा अंगठा बघून लोकांनी त्याला एलियन असल्याचे म्हटले आहे. अनेकजण त्याचा हा अंगठा बघून आश्चर्यचकित झाले आहेत. जैकब म्हणाला की, जेव्हा लोक माझा अंगठा बघतात तेव्हा हैराण होतात. स्वतःचा अंगठा माझ्या अंगठ्याबरोबर जोडून मोजतात. मला ते चांगले वाटते.

Leave a Comment