गोलंदाजांचा कर्दनकाळ चक्क वाजवत आहे बासरी


नवी दिल्ली – टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिखर धवनने स्वत: हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गब्बर बासरी वाजवताना दिसत आहे. शिखर धवनच्या बासरी वाजविण्याच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. शिखर धवन सर्वोत्कृष्ट बासरी वाजवतो आणि चाहत्यांनाही त्यांची शैली खूप आवडते. गब्बरने शेअर केलेल्या या व्हिडिओला अवघ्या काही मिनिटांत लाखो लाईक्स मिळाले आहेत.


व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की शिखर धवन समुद्राकडे पहात असताना बासरी वाजवत आहे आणि व्हिडिओमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट देखील ऐकायला येत आहे. शिखरने यात निळा रंगाचा टी-शर्ट आणि स्काय कलरमध्ये हाफ पँट घाललेला दिसत आहे. गब्बरच्या बासरीचे सूर ऐकल्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून त्यावर प्रतिक्रिया देत त्यांनी त्याचे कौतुक केले. या व्हिडिओवर चाहत्यांनी लिहिले, वाह गब्बर पाजी जबरदस्त, गब्बर इज बॅक, गब्बर सर्वत्र आहे. काही चाहत्यांना असा विश्वास नव्हता की तो खरोखरच शिखर धवन आहे, म्हणून ते म्हणाले, सर, तुम्हीच आहात काय?


शिखर धवन यावेळी टीम इंडियाबरोबर नव्हता तर तो केवळ विंडीज टूरवरील एकदिवसीय मालिकेसाठी गेला होता. या मालिकेत धवनने 2 डावात 38 धावा केल्या असल्या तरी टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. शिखर धवनने टीम इंडियासाठी खुपवेळा चांगला खेळ केला असून त्यात त्याने अनेक सामने देखील जिंकून दिले आहे.

Leave a Comment