गणेशोत्सवानिमित्त रणवीर सिंहची स्पेशल भेट


देशभरात सध्या गणेशोत्सवाची धूमधाम असून सर्वसामान्यांसह बाप्पा बॉलिवूडचा सुद्धा कायम लाडका राहिलेला आहे. बाप्पाची विविध पद्धतीने बॉलिवूडच्या अनेक स्थरातून आराधना केली जाते. अभिनेता रणवीर सिंहने अशाच एक आगळ्या-वेगळ्या आणि त्याच्या हटके स्टाईलमध्ये या वर्षी बाप्पाची आराधना केली आहे. नुकतेच रणवीरकडून गणपती आला रे या गाण्याचे अनावरण करण्यात आले आहे. काम भारी या मराठी रॅपरचे गणपती आला रे हे गाणे असून ते नुकतेच मुंबईत रणवीरच्या हस्ते रिलीज केले गेले.

आपल्या हटके स्टाईलमध्ये यावेळी रणवीर तर दिसलाच पण त्याचसोबत तो गाण्याबद्दल देखील भरभरुन बोलला. रणवीर गाण्याबद्दल बोलताना म्हणाला, या गाण्यातील सेलिब्रेशनचा जो संदेश द्यायचा आहे, तो गाण्याच्या म्युझिकल एलिमेन्ट्से त्या गाण्याच्या ट्रॅकला पूर्ण साजेसा ठरतो. काम भारी गाण्याचे लिरिक्स आणि आगळे-वेगळे संगीत या गाण्याला सुंदर पद्धतीने बांधून ठेवतात आणि आपल्या उत्सुकतेला सुद्धा आपण आपल्या गणपती बाप्पाचे स्वागत करत आहोत आणि त्यात पाऊस सुद्धा आहे, ज्याच्याकडून कुठेतरी वचन मिळते की आपली सगळी दुःख आणि आपल्या मनातील सगळ्या अढी या पावसात वाहुन जातील, मागे एक उमेदीचा किरण आणि पॉझिव्हिटी आपल्या हृदयात ठेवतात, असे म्हटले आहे.


रणवीरने गाण्याचे कौतुक केल्यानंतर गाण्याच्या व्हिडिओवर व्यक्त झाला आणि म्हणाला, काम भारी जंगलातून चालत जाताना दिसतो आणि मग तो मातीच्या मूर्तीला वंदन करतो, हे हिरवंगार जंगल या सहराच्यामध्ये वसलेले आहे, एक साधा सरळ उद्दिष्ट घेऊन की आपल्या या सगळ्याचे संवर्धन करायचे आहे आणि यात असलेल्या सगळ्या जिवांचा आपल्या सांभाळ करायचा आहे, जिवंत असलेल्या प्रत्येक रुपाचा: माणूस, प्राणी आणि निसर्ग…” या गाण्याबद्दल रणवीर खूप मनापासून व्यक्त झाला. या गाण्याची झलक त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पण दिली आहे. त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर तर या गाण्याला ५.६० लाखांच्या वर व्ह्यूज आले आहेत.

Loading RSS Feed

Leave a Comment