सोशल मीडियात व्हायरल होत आहे हा नौदलाचा अधिकारी


सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यामध्ये पत्नीला इंप्रेस करण्यासाठी भारतीय नौदलाच्या एका अधिकाऱ्याला 5 टास्क पूर्ण करावे लागले आहेत. सध्या या गेमचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत.


तुम्ही या फोटोंमध्ये पाहू शकता की, तब्बल 10 इतर अधिकाऱ्यांसोबत हा अधिकारी तिला सलामीदेखील देत आहे. एक तलवार प्रत्येक जवानाच्या हातामध्ये आहे आणि एकमेकांच्या विरोधात ते उभे आहेत. अधिकारी पती आणि पत्नी तेव्हाच पुढे जाऊ शकतात जेव्हा तो त्यांच्या अधिकाऱ्याने दिलेले टास्क पूर्ण करेल.अधिकाऱ्याला पहिले टास्क पूर्ण करण्यासाठी 20 फूट उंचीवरून उडी मारावी लागली. तर पत्नीसोबत डान्स करण्याचे दुसऱ्याने चॅलेंज दिले.


त्यानंतर अधिकाऱ्याला तिसरे टास्क म्हणून 10 पुशअप्स करावे लागले आणि प्रत्येत पुशअपला पत्नीचे नाव घेऊन I Love You बोलायला लावले.


अधिकाऱ्याला चौथ्या टास्कमध्ये पत्नीला किस करायला लावले. तर पत्नीला उचलण्याचे टास्क पाचव्या टास्कमध्ये दिले गेले. सोशल मीडियावर सध्या या सगळ्या रोमँटिक खेळाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Leave a Comment