रानू यांच्या तिसऱ्या गाण्याचा व्हिडीओ हिमेशने केला शेअर


एका व्हायरल व्हिडिओमुळे रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडल आज बॉलिवूडच्या प्लेबॅक सिंगर झाल्या आहेत. त्यांना पहिला ब्रेक प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाने दिला आणि त्यांचे अवघे आयुष्यच बदलून गेले. रानू यांच्या तिसऱ्या गाण्याचा व्हिडिओ हिमेश रेशमियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. रानू यांचा जबरदस्त अंदाज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

हिमेशने ‘तेरी मेरी कहानी’ आणि ‘आदत’ या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर रानू यांच्या तिसर्‍या गाण्याचा व्हिडिओ आता शेअर केला आहे. रानू यांची स्टाईल या नवीन गाण्यातील सर्वात खास गोष्ट आहे. रानू यावेळी अधिक आत्मविश्वासाने गाताना दिसत आहेत. हिमेश त्यांच्या शेजारी उभा राहून गाण्याचा आनंद लुटताना दिसत आहे. या व्हिडिओमधील रानू यांचे हास्य सगळ्यांना भूरळ घालणारे आहे.


हिमेश रेशमियाने हे गाणे शेअर करताना लिहिले की, आशिकी मे तेरी या आगामी गाण्याची ही झलक आहे. रानूजींची अष्टपैलुत्व आणि त्यांचा आत्मविश्वास प्रत्येक गाण्यात वाढत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणल्याबद्दल सर्वांचे आभार. 13 वर्षांपूर्वी 2006 मध्ये रिलीज झालेल्या ’36 चायना टाऊन’ चित्रपटाच्या ‘आशिकी मे तेरी’ या गाण्याचे हे गाणे रिमेक आहे.

Leave a Comment