सोशल मीडियात चर्चा या अंतराळवीराची


आज एकीकडे भारताच्या चंद्रयान-2 या मिशनची जगभरात चर्चा सुरू आहे. मात्र एक व्यक्ती अंतराळ यात्रीप्रमाणे वेशभुषेत बंगळुरुच्या रस्त्यावर दिसला आहे. हा व्यक्ती चंद्रावर उतरलेला कोणताही अंतराळ यात्री नव्हता तर बंगळुरुमधील मांगडी रोडच्या रस्त्यावर चालणारा एक कलाकार होता. बादल ननजुंद स्वामी नावाच्या या व्यक्तीने अंतराळ यात्रीच्या वेशात हा मुन वॉक केला. हे करण्यामागे त्याचा उद्देश होता की, बंगळुरुच्या रस्त्यांची परिस्थिती लोकांच्या लक्षात यावी.

अशाप्रकारे विरोध करण्याचा हटके अंदाज लोकांना खूपच आवडला. बंगळुरुमध्ये खराब रस्त्यांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. 2015 मध्ये देखील रस्त्याच्या मध्यभागी एक मगर दिसली होती. ही मगर देखील रस्त्याच्या मध्यभागी या बादलनेच काढली होती. मगरीची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर महापालिकेने खड्डे भरले होते.


बादलचा हा हटके अंदाज अनेकांना आवडला. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील ट्विट करत म्हटले की, मी ट्विट करत सांगितले होते की, युक्रेनची लोक खड्ड्यांचा कशाप्रकारे सामना करतात. आता बघा भारतीयांनी देखील या समस्येला स्ट्रीट आर्टमध्ये बदलले.

Leave a Comment