या आहेत जगामध्ये अस्तित्वात असलेल्या काही अजब परंपरा

wierd
जगामध्ये अनेक देशांच्या काही खास परंपरा आहेत. यातील काही परंपरा खरोखर विचित्र म्हणाव्या लागतील. अशीच एक अजब परंपरा स्पेन येथील कॅस्टीलो येथे आहे. या परंपरेनुसार येथे दर वर्षी ‘बेबी जम्पिंग फेस्टिव्हल’ चे आयोजन केले जात असते. या उत्सवादरम्यान नवजात अर्भकांना जमिनीवर गादी घालून झोपविले जाते आणि या उत्सवामध्ये भाग घेणाऱ्या व्यक्ती एका उडीमध्ये ही गादी ओलांडतात. या अर्भकांना ओलांडण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती सैतानाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. त्याने या अर्भकांना ओलांडून उडी घेतली, की नकारात्मक शक्ती नवजात अर्भकांना अपाय करू शकणार नाहीत अशी मान्यता या परंपरेमागे दिसून येते. ही परंपरा स्पेन मध्ये सतराव्या शतकापासून चालत आली आहे. तसेच या उत्सवामध्ये सहभागी न झालेले नवजात अर्भक भविष्यकाळामध्ये कोणत्याही वेळी नकारात्मक शक्तींनी प्रभावित होण्याच्या धोक्याला सामोरे जात असल्याचे म्हटले जाते.
wierd1
थायलंड देशामध्ये ‘व्हेजिटेरियन फेस्टिव्हल’ साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा अजब आहेच, पण काहीशी अस्वस्थ करणारी देखील आहे. या उत्सवाच्या नावाच्या एकदम विपरीत अश्या या उत्सवातील चालीरीती आहेत. या उत्सवामध्ये नऊ देवतांची पूजा केली जाते. या उत्सवामध्ये सहभागी होणारे भाविक नऊ दिवस संपूर्ण संयमाचे पालन करतात. हा उत्सव शुद्धीकरणाचा उत्सव समजला जात असल्याने या उत्सवादरम्यान भाविक मांसाहाराचे सेवन करीत नाहीत. या उत्सवाचा अस्वस्थ करणार अभाग असा, की या काळादरम्यान भाविक आपल्या शरीराला धारदार हत्यारांच्या मदतीने इजा करून घेत असतात.
wierd2
एल साल्व्हाडोर येथे ‘बोलस दे फुएगी’ नामक परंपरा आहे. एल साल्व्हाडोर येथील नेजला नामक लहानशा शहरामध्ये या उत्सवाचे आयोजन केले जात असते. या गावामध्ये दर वर्षी या उत्सवासाठी लोक एकत्र येत असतात. येथे एकत्र येऊन एकमेकांवर आगीच्या गोळ्यांचा वर्षाव करीत हा उत्सव साजरा करण्याची ही परंपरा आहे. या उत्सवामध्ये सहभागी होणारे सर्वच जण सुरक्षा कवच लेऊन या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. पेरू देशातील दक्षिणी लिमा येथे ‘कॅट फूड फेस्टिव्हल’ साजरा केला जातो. या उत्सवामध्ये मांजरींना खाऊ घातले जात नसून, मांजरींनाच भोजन म्हणून पेश केले जाण्याची परंपरा आहे.

Leave a Comment