चित्तथरारक ठरला या महिलेचा ‘टाईम ट्रॅव्हल’ चा अनुभव

time
सध्याचे युग हे विज्ञानाचे युग आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये दडलेल्या अनेक रहस्यांची उकल विज्ञानाच्या मदतीने मानवाने केली आहे. ज्याप्रमाणे अनेक शतकांपूर्वी मानवी जीवन या पृथ्वीवर कसे होते याचे नित्य नवे शोध विज्ञानाच्या मदतीने लागत आहेत, त्याचप्रमाणे भविष्यकाळात पृथ्वी कशी असणार आहे आणि त्यावरील जीवन कसे असणार आहे याचा ही शोध वैज्ञानिक घेत आहेत. त्या दृष्टीने ‘टाईम ट्रॅव्हल’, म्हणजेच वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यामातून भविष्यकाळामध्ये प्रत्यक्ष जाऊन, त्या काळामधील जीवनाचा अनुभव घेण्याची कल्पना विकसित झाली आहे. आजवर अश्या अनेक टाईम ट्रॅव्हलचे यशस्वी प्रयोग करण्यात वैज्ञानिकांना यश आले असल्याचे म्हटले जाते. अश्याच प्रकारचा प्रयोग काही दशकांपूर्वी एका महिलेवर करण्यात आला होता.
time1
फिनलंडची निवासी असणारी क्लोई ही महिला अश्याच प्रकारे टाईम ट्रॅव्हलच्या माध्यमातन सहा हजार सालामध्ेआ जाऊन आली असल्याचा दावा करीत आहे. तिच्या या टाईम ट्रॅव्हलची साक्ष देणारे काही ठळक पुरावेही तिच्याकडे असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिच्या म्हणण्यानुसार ४,५२९ साली डायनोसॉर पृथ्वीतलावर परतणार असून, त्यांना प्राणीसंग्रहालायांमध्ये पाहण्याची संधी लोकांना मिळणार आहे. तसेच आपण कल्पना करतो त्याप्रमाणे हे प्राणी धोकादायक नसल्याचे क्लोईचे म्हणणे आहे.
time2
क्लोईचा टाईम ट्रॅव्हलचा अनुभव अतिशय चित्तथरारक ठरला असल्याचे तिचे म्हणणे असून, सुरुवातीला या यंत्रामध्ये प्रवेश करण्याबाबत ती काहीशी चिंतीत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर ३ ऑगस्ट १९६६ रोजी अखेर तिने टाईम ट्रॅव्हल करण्याची तयारी दर्शिविली. त्यानंतर तिला एका खुर्चीवर बसविण्यात येऊन, तिच्या डोक्यावर एक धातूची तार जोडण्यात आली. या तारेतून हलका विद्युत प्रवाह तिच्या शरीरामध्ये प्रवाहित करण्यात आला. त्यानंतर क्लोईची शुद्ध हरपली. पुन्हा शुद्धीवर आल्यानंतर आपण सहा हजार सालामध्ये असल्याचे क्लोई म्हणते. या वेळी तिला तिच्या सभोवती मोठमोठ्या गगनचुंबी इमारती दिसल्या. तसेच सर्व परिसरामध्ये फळा-फुलांनी लगडलेले वृक्षही दृष्टीस पडले. तसेच निरनिराळे प्राणीही आपल्याला दिसल्याचे क्लोई सांगते.
time3
या ठिकाणी पुनरुज्जीवित केले गेलेले ‘रोकलोरुलो’ नामक झाडही क्लोईला ठिकठिकाणी दिसले असून, हे झाड डायनोसॉर्सचे खाद्य असल्याचे ती म्हणते. येथे असणाऱ्या सर्व वस्तू विजेवर चालणाऱ्या असून, कोणत्याही वस्तूमुळे प्रदूषण होत नसल्याचे क्लोई सांगते.

Leave a Comment