श्रद्धा कपूरचे आरेचे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन


मेट्रो कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आरे कॉलनीतील २ हजार २३८ झाडे अखेर कापण्यात येणार आहेत. नागरिकांनी या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. तर, बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील नागरिकांच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे.


सध्या सोशल मीडियावर श्रद्धा कपूर आंदोलनात सहभागी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. श्रद्धा या व्हिडिओमध्ये ही झाडे आमची, नाही कुणाच्या बापाची असा नारा लगावताना दिसत आहे. तसेच, श्रद्धा यावेळी पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत असून ‘सेव आरे’ असा मजकूरही तिच्या टी-शर्टवर लिहिल्याचे दिसत आहे.


या आंदोलनाचे काही फोटो श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरदेखील शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करत मेट्रो बांधकामसाठी २७०० हून अधिक वृक्ष तोडण्यात आले आहेत. हे आम्हाला मान्य नाही. आधीच आपल्याकडे पर्यावरणासंबंधीत खूप समस्या आहेत आणि त्यातच आमच्या फुफ्फुसांचा नाश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. झाडे तोडणे थांबवा, असे कॅप्शन दिले आहे. अनेकांनी श्रद्धाच्या या पोस्टवर कमेंटही केल्या आहेत. श्रद्धाचे पर्यावरणावरील प्रेम पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

Leave a Comment