गुगलने जीमेल आणि हँगआऊटसाठी आणले नवे फिचर


जीमेल आणि हँगआऊट युजर्ससाठी गुगलने एक नवे फिचर आणले आहे. युजर्स या फिचरच्या मदतीने इमेल आणि पिंग (चॅट नोटिफिकेशन) अलर्ट मिळणार नाही. पण गुगल कॅलेंडरमध्ये युजर्स आउट ऑफ ऑफिस नावाने मार्क करु शकतात. इमेल चॅट पाठवणाऱ्या युजर्सला हे फिचर इमेल कंपोज करताना किंवा हॅंगआउटच्या चॅट विंडोमध्ये एका बॅनर स्वरुपात दिसणार आहे.

पण इमेल मिळालेल्या युजरला त्याच्या नावापुढे आउट ऑफ ऑफिस असे लिहिलेले दिसणार आहे. त्याचसोबत तुम्ही यामध्ये समोरील युजर्सला कधी पर्यंत मेसेज पाठवू शकता. तसेच गुगलने त्यांच्या ब्लॉगपोस्ट मध्ये असे लिहिले आहे की, हे फिचर लॉन्च झाल्यानंतर इमेल मधील सेंड ऑप्शनवर क्लिक करण्यापूर्वीच युजर्स आउट ऑफ ऑफिसमध्ये असल्याचे नोटिफिकेशन देण्यात येणार असल्यामुळे त्यामुळे युजर्सला येणारे Unkown Mail किंवा चॅट पासून दूर राहता येणार आहे. गुगलचे हे फिचर एका प्रकारे Do Not Disturb सारखे आहे.

तर गुगलने हँगआउट बंद होणार असल्याचे सांगितले होते. पण गुगलकडून बंद होण्याची तारीख वाढवण्यात आली असून जून 2020 पर्यंत अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे. मात्र हँगआउट पूर्णपणे बंद झाल्यानंतर त्याचे दोन भागात विभाजन होणार आहे. एक म्हणजे Meet आणि दुसरा Chat.

Leave a Comment