जीवाचा थरकाप उडविणारे स्पेनमधील सर्वात भीतीदायक घर- कासा एनकान्टडा

hunted
स्पेन देशातील कासा एनकान्टडा ही इमारत अतिशय भीतीदायक समजली जाते. येथे जाण्याचे धाडस आजवर फार कमी लोकांनी केले आहे. या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा वास असून, या घराचा इतिहास भीतीने एखाद्याच्या जीवाचा थरकाप उडवेल असा आहे. या घराला ‘कोर्टीजो जुराडो’ या नावाने देखील ओळखले जाते. सुरुवातीला ही इमारत स्पेन येथील एंडलुसिया प्रांतामध्ये राहणाऱ्या मैलागा परिवाराने खरेदी केली होती. एंडलुसिया येथे राहणाऱ्या अनेक धनाढ्य परीवारांपैकी मैलागा परिवार होता. या ठिकाणी एक मोठे कृषी उद्यान बनविण्याचे मैलागा परिवाराने ठरविले होते.
hunted1
या घराशी निगडीत भीतीदायक घटनांची सुरुवात १८५० साली झाली. सर्वप्रथम या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना या घराच्या आसपास काळ्या सावल्या दृष्टीस पडू लागल्या. तसेच या घराच्या काही खोल्यांमध्ये अचानक प्रकाशाचे झोत दिसत असत, आणि गायबही होत असत. घरातील वस्तूही अचानक गायब होत असत, किंवा त्यांची जागा बदललेली दिसे. वेळी अवेळी या घरातून निरनिराळे आवाजही कानी पडत असत. स्थानिक लोकांच्या मते, मैलागा परिवाराने हे घर खरेदी करण्यापूर्वी या ठिकाणी जे लोक राहत होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक भयानक अपराध या वास्तूमध्ये घडले होते, तसेच याताना देऊन अनेकांना या वास्तूमध्ये मारून टाकले गेले असल्याच्या कथाही सांगितल्या जात असत.
hunted2
१९२५ साली जुराडो नामक परिवाराने ही इमारत खरेदी केल्यानंतरही येथे घडणाऱ्या भीतीदायक घटना सुरूच राहिल्या. आणि म्हणूनच असामान्य, असाधारण घटना घडणारी वास्तू म्हणून या वास्तूची ख्याती सर्वत्र पसरली. या घरामध्ये एके काळी अनेक तरुण मुलींचा बळी दिला गेला असून, त्यांच्या किंकाळ्या आजही या वास्तूमध्ये ऐकू येत असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment