नेमक आहे तरी काय डब्रो डायट ?

diet
सध्या कीटो डायट अतिशय लोकप्रिय असून, या डायट मध्ये कर्बोदके कमी प्रमाणात सेवन करायची आहेत, व स्निग्ध पदार्थांचे सेवन अधिक आहे. वजन घटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंडळींमध्ये हे डायट अतिशय लोकप्रिय होत असताना पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते बड्या बड्या हॉलीवूड, बॉलीवूड सेलिब्रिटीजनी या डायटचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र आता या कीटो डायट नंतर सध्या एका नव्या डायटची चर्चा सर्वत्र कानी येत आहे. या डायटला ‘डब्रो डायट’ या नावाने संबोधले जात असून, ही अमरिकेतील हिदर डब्रो आणि डॉ. टेरी डब्रो या दाम्पत्याने विकसित केलेली आहारपद्धती आहे.
diet1
वजन घटविण्याच्या दृष्टीने ही आहारपद्धती अतिशय प्रभावी मानली जात असून, वजन घटण्यासोबतच शरीराची बळकटी हे ही या आहारपद्धतीचे ध्येय आहे. मग सध्या लोकप्रिय असलेल्या कीटो डायट आणि आता नव्याने विकसित डब्रो डायटमध्ये फरक तो काय? तर डब्रो डायटनुसार आहारातून कर्बोदके कमी किंवा स्निग्ध पदार्थ अधिक अश्या प्रकारचे बदल करायचे नसून, यामध्ये भोजनाच्या ठराविक वेळा आहेत, आणि त्याशिवाय मधल्या वेळेला काही ठराविक तासांचा उपवास, असे हे डायट आहे. सध्या लोकप्रिय होत असलेल्या ‘इंटरमिटंट फास्टींग’शी मिळते जुळते असे हे डायट आहे. या डायटला डब्रो दाम्पत्याने ‘इंटरव्हल इटिंग’ असे ही नाव दिले आहे.
diet2
या आहारपद्धतीनुसार तीन वेगवेगळ्या ‘phases’ मध्ये भोजन घ्यायचे असून, प्रत्येक ‘phase’ चा fasting period निराळा आहे. या आहारपद्धतीच्या पहिल्या फेज मध्ये शरीराची भूक नियंत्रित आणि मर्यादित करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी दिवसातील किमान सोळा तास उपवास करणे आवश्यक आहे. ही फेज पूर्ण करण्यासाठी पाच दिवसांचा अवधी दिला गेला आहे. या फेजदरम्यान मद्यप्राशन वर्ज्य आहे. त्यानंतर सुरु होत असलेल्या दुसऱ्या फेजमध्ये निरनिराळे fasting periods आहेत. ज्यांना जितक्या वेगाने वजन घटवायचे आहे, त्यांनी त्यानुसार हे fasting periods निवडायचे आहेत. सोळा तासांपासून बारा तासांपर्यंत असे हे निरनिराळे उपवासाचे कालावधी आहेत. तसेच आपल्या आवडीचे पदार्थ खाण्याची मुभा, वेळापत्रक न सांभाळता आठवड्यातून एक दिवस या डायटमध्ये देण्यात आली आहे.
diet3
या डायटमध्ये मुख्य समावेश पालक, केल, हिरव्या शेंगभाज्या, चिकन, मासे, दुधाशिवाय चहा किंवा कॉफी, इत्यादींचा करायचा आहे. तसेच या आहारपद्धतीचा अवलंब करणाऱ्यांनी हा आहार बदल तात्पुरता करायचा नसून कायमस्वरूपी करायचा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment