अमेरिकेमध्ये आहेत असे ही अजब कायदे !

laws
अमेरिका खरे तर प्रगत देशांपैकी आघाडीवर असणारा देश आहे. पण या अतिप्रगत देशामध्येही काही अजब कायदे आहेत. अनेकदा लोक चित्रविचित्र कामे करीत असतात, पण अश्या प्रकारच्या असामान्य कामांना अमेरिकेमध्ये कायद्याने बंदी घातली गेली आहे. उदाहरणच द्यायचे झाले. तर स्विमिंग पूलमध्ये पाण्याच्या आत सायकल चालविण्याचे देण्यात येईल. हे प्रयोग आधी कोणी तरी करून पहिले असल्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि म्हणूनच कॅलिफोर्निया राज्यामध्ये पूलमध्ये पाण्याच्या आत सायकल चालविण्याला कायद्याने बंदी करण्यात आली आहे.
laws1
टेनेसीमध्ये आतून पोकळ असलेली झाडांची खोडे विकण्यास कायद्याने मनाई आहे, तर अलाबामा येथे पँटच्या मागच्या खिशामध्ये आईस्क्रीम कोन ठेवण्यास मनाई आहे. पँटच्या मागच्या खिशामध्ये आईस्क्रीम कोन ठेवण्याची कल्पना आपण भारतामध्ये करू शकत नसलो, तरी अमेरिकेमध्ये ही पद्धत सर्वमान्य असल्याचे समजते. मिशिगन राज्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या जोडीदाराची फसगत करण्यावर कायद्याने बंदी आहे. येथे कोणी आपल्या जोडीदाराची फसगत केल्यास चार वर्षांचा तुरुंगवास आणि पाच हजार डॉलर्सचा दंड होऊ शकतो.
laws2
न्यू हॅम्पशायर या ठिकाणी ‘सी वीड’ म्हणजे समुद्री वनस्पती रात्रीच्या वेळी पाण्यातून काढण्यास मनाई आहे. सी-वीडचा वापर अमेरिकेमध्ये आणि इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असून, याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. पण हे सी-वीड अनधिकृतरित्या काढले जाऊन त्याची तस्करी होऊ नये यासाठी ही पाऊल उचलण्यात आल्याचे समजते. अलाबामा या ठिकाणी चर्चमध्ये खोट्या मिश्या लावून जाण्यास कायद्याने मनाई आहे. तर साऊथ डकोटा येथील चीझ बनविण्याच्या कारखान्यामध्ये जमिनीवर झोपणे बेकायदेशीर आहे.
laws3
टेनेसी येथे ‘नेटफ्लिक्स’ चा पासवर्ड इतरांशी शेअर करणे कायद्याने मना आहे, तर इंडियानामध्ये निव्वळ हातांचा वापर करून (विना जाळ्याचा उपयोग करता) मासे पकडण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मेरीलंड येथे वाहन चालविताना असभ्य भाषेचा उपयोग कायद्याने मना आहे, तर व्हरमॉन्ट येथे महिलांना कृत्रिम दात लावून घेण्यासाठी त्यांच्या पतीची लेखी परवानगी घ्यावी लागते असा अजब कायदा आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment