मोदींच्या नावाने बोट मोडणाऱ्या पाक मंत्र्यांला लागला शॉक


इस्लामाबाद : जगभरात काश्मीर मुद्यावरून तोंडघशी पडल्यानंतर पाकिस्तानची खोड अजूनही मोडलेली दिसत नाही. केंद्रातील मोदी सरकारने जम्मू काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान बावचळला आहे. त्यातच इम्रान खान सरकारमधील मंत्री सतत भारताविरूद्ध गरळ ओकत आहेत. काश्मीरी जनतेसोबत असल्याचे दाखविण्यासाठी पाकिस्तानने शुक्रवारी काश्मीर आव्हर साजरा केला. या दरम्यान पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद एका सभेला संबोधित करत होत, त्यावेळी त्यांना अचानक शॉक लागला.

हा व्हिडिओ ट्विटरवर पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी शेअर केला आहे. यात वारंवार अणू हल्ल्याची धमकी देणारे शेख रशीद म्हणत होते की, मोदी आम्ही तुमचे धोरण ओळखतो. असा म्हटल्यावर माईकमधून अचानक करंट पास झाला. त्यानंतर ते गोंधळले आणि म्हटले मला वाटते की करंट आला होता. या सभेला मोदी नाकाम नाही करू शकत, असे म्हटल्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. पण त्यांच्या या वक्तव्यातून मोदी यांच्याबद्दलची भीती दिसून येत होती. शेख रशीद यांनी भारताविरूद्ध अनेकदा गरळ ओकली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी भारताला अणू हल्ल्याची धमकी दिली होती.


शेख रशीद यांच्यावर काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये एका सभेत अंडेफेक करण्यात आली होती. लंडनमध्ये एका कार्यक्रमात भाग शेख रशीद घेण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणाहून जसे बाहेर आले तसे त्यांवर अंड्यांचा वर्षाव झाला. रशिदच्या साथीदारांनी अंडेफेक करणाऱ्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो फरार झाला. या दरम्यान शेख यांचा पूर्ण चेहरा खराब झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Leave a Comment