वीस हजार रुपये किंमत असलेल्या पायमोज्यांच्या जोडीमध्ये असे काय आहे खास?

scoks
अमेरिकेमधील फ्लोरिडा राज्यातील विंटर पार्कची रहिवासी असलेल्या लिंडसे इलियटला जेव्हा मुलगी झाली, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. एखाद्या आईला आपल्या मुलीबद्दल वाटणारी चिंता लिंडसेला वाटणे स्वाभिविक होते. मुलीचे आरोग्य चांगले राहावे यासाठी लिंडसे सदैव प्रयत्नशील असे. आता तिच्या मदतीला आला आहे एक पायमोज्यांचा जोड. हे पायमोजे साधेसुधे नसून, हे ‘स्मार्ट पायमोजे’ आहेत. बाळाच्या पायांमध्ये हे मोजे चढविल्यानंतर बाळाच्या शरीराचे तापमान, त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची गती, आणि त्या आधारे बाळाच्या शरीरामध्ये असणाऱ्या ऑक्सिजन लेव्हल्स, हा सर्व डेटा हे पायमोजे देत असतात. या ‘स्मार्ट सॉक्स’ ची किंमत तीनशी डॉलर्स, म्हणजे भारतीय चलनानुसार सुमारे वीस हजार रुपये इतकी आहे. एखाद्या अॅक्टिव्हिटी ट्रॅकर प्रमाणे हा पायमोज्यांचा जोड काम करीत असतो.
scoks1
हा पायमोज्यांचा जोड बाळाच्या पायांमध्ये घातल्यानंतर बाळाचे आई-वडील त्यांच्या स्मार्ट फोनच्या मदतीने स्मार्ट सॉक्स वरील डेटा ट्रॅक करू शकतात. त्यामुळे बाळाच्या आसपास नसूनही त्यांना बाळाच्या शरीराचे तापमान, त्याच्या हृदयाची गती इत्यादी माहिती सहज मिळत राहणे शक्य होते. इलियट प्रमाणे अनेक माता-पित्यांनी या ‘बेबी टेक्नोलॉजी’चा अवलंब केला आहे. गेली अनेक वर्षे काही कंपन्या खास लहान मुलांसाठी अॅक्टिव्हिटी ट्रॅकर्स बनविण्याच्या प्रयत्नात होत्या. या प्रयत्नांना आता यश आले असून, याला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे समजते.
scoks2
ऑस्ट्रेलिया येथील सोशल रिसर्च कंपनी ‘मॅक-क्रिंडल’ च्या सर्वेक्षणानुसार दर आठवड्यामध्ये जगभरातील सुमारे पंचवीस लाख लोक या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत असतात. या तंत्रज्ञानाच्या मते बाळाच्या भोजनाच्या वेळा, कपडे बदलण्याच्या वेळा, इत्यादींबद्दल ‘रिमाईंडर’ आणि ‘फीडबॅक’ ही या उपकरणांच्या द्वारे मिळत रहातात.

Leave a Comment