कोण आहे सर्वोत्कृष्ठ यष्टिरक्षक?, भारतीय चाहत्यांनी दिले हे उत्तर


क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट विकेटकिपर कोण अशी जेव्हा चर्चा होते त्यावेळी अ‍ॅडम गिलक्रिस्ट, कुमार संघकारा, मार्क बाउचर अशी नावे येतात. मात्र याहीआधी सर्वात प्रथम नाव येते ते म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे. महेंद्रसिंग धोनी फलंदाजाला अशाप्रकारे कॅच अथवा रन-आउट करतो की, तो फलंदाज हे कसे घडले म्हणून आश्चर्यचकित होतो. आपल्या चपळतेसाठी धोनी नेहमीच ओळखला गेला आहे.


काउंटी क्रिकेट सरेने विकेटकिपर बेन फोक्सचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो फलंदाजाला स्टंप करत आहे. सरेने हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले की, असा खेळाडू सांगा जो यापेक्षाही फास्ट आहे. तुम्हाला आव्हान आहे.

सरेने हे असे आव्हान केल्यावर भारतीय फॅन्स देखील महेंद्रसिंग धोनीची तारीफ करण्यास सक्रिय झाले.


इंग्लंडचा माजी खेळाडू ओवेस शाहने महेंद्रसिंग धोनीच सर्वोत्तम विकेटकिपर असल्याचे सांगितले.
https://twitter.com/amitkyadav22/status/1166707046252605440


अनेकांनी धोनीला विकेटकिपिंगचा मास्टर असल्याचे म्हटले तर अनेकांनी धोनी विकेटकिपिंगचा राजा असल्याचे म्हटले.


काउंटी टीमने हे ट्विट फोक्सची प्रशंसा करत टाकले होते. मात्र भारतीय चाहत्यांनी विकेटकिपिंगचे दुसरे नाव म्हणजेच धोनी असल्याचे दाखवून दिले.

Leave a Comment