7 वर्षांपर्यंत टिकेल 100 रुपयांची ही खास नोट


आता 100 रुपयांची स्पेशल नोट जारी करण्याच्या तयारीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. अनेक खास गोष्टी या नोटेत असतील. नवी नोट सध्याच्या नोटेपेक्षा टिकाऊ असेल. सरासरी अडीच ते तीन वर्षांपर्यंत सध्याची शंभर रुपयांची नोट टिकते. पण वॉर्निश लावलेली नवी नोट 7 वर्षांपर्यंत टिकेल. ही नोट सध्या प्रायोगिक तत्वावर जारी करण्यात येणार आहे.

खास लेअर असलेल्या नोटा लवकर फाटत नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात या नोटांबाबतची माहिती देण्यात आली आहे. शंभर रुपयांची नवी नोट लवकर फाटणार नाही. तसेच पाण्यात भिजली तरी ती सुरक्षित राहील. लाकडावर किंवा लोखंडावर लावण्यात येणाऱे वॉर्निश या नोटेला असणार आहे.

एक हजार शंभर रुपयांच्या नोटांसाठी सध्या 1570 रुपये खर्च येतो. त्यात 20 टक्के जास्त खर्च येईल. पाणी किंवा, केमिकल यामुळे नोटा खराब होणार नाही. सध्याच्या नोटांपेक्षा नव्या नोटा खराब होण्याचे प्रमाण कमी असेल. वॉर्निशमुळे नोटांची घडी सारखी सारखी घालता येणार नाही. आता बाजारात असलेल्या नोटांच्या तुलनेत या नोटा फाटण्याचे प्रमाण कमी आहे. अनेक देशांमध्ये या नोटांचा वापर केला जातो. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. सध्यातरी फक्त 100 रुपयांच्या नोटांवर रिझर्व्ह बँकेने केला आहे.

रिझर्व्ह बँकेने हा निर्णय नोटा लवकर खराब होत असल्यामुळे घेतला आहे. फाटलेल्या, खराब झालेल्या नोटांमुळे दरवर्षी लाखो कोटींच्या नोटा बदलून द्याव्या लागतात. प्रत्येक 5 नोटांमागे एक नोट खराब होते. यावर मोठा खर्च करावा लागतो. यामुळेच रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment