संजय दत्तच्या प्रस्थानमचा ट्रेलर रिलीज


संजय दत्तच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘प्रस्थानम’ या चित्रपटाची माहिती प्रेक्षकांना दिल्यानंतर गुरुवारी दुपारी चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

चित्रपटातील सर्व पात्रांची माहिती टीझरमध्ये दिल्यानंतर ट्रेलरमध्ये आता संजय दत्त तो साकारत असलेल्या बलदेव प्रताप सिंहच्या प्रवासात घेऊन जातो. सेल्युलॉइडवर संजयसोबतच अली फजल, मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अमिरा दस्तूर आणि सत्यजीत दुबे यांची झलक देखील या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

चंकी पांडेनेही आपली डॉन काली ही भूमिका उत्तमरित्या बजावल्याचे या ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर जॅकी श्रॉफने देखील त्याची भूमिका उत्तम पार पाडल्याचे दिसते. पण ट्रेलरचा मुख्य भाग असलेल्या अली फजल आणि सत्यजीत दुबे यांच्यातील वर्चस्वाच्या युद्धावर लक्ष केंद्रित करतो.

चित्रपटाचे कथानक एका राजकीय परिवाराभोवती फिरत आहे जे महाभारतासारखेच आहे कारण त्यातही इच्छेच्या गुंतागुंतीच्या मुद्द्यांचा आणि हक्कांच्या चुकीच्या युद्धाचा विषय आहे.

देवा कट्टा दिग्दर्शित ‘प्रस्थानम’ हा 2010 च्या त्याच नावाच्या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात 20 तारखेला रिलीज होणार आहे.

Leave a Comment