येत्या दिवाळीत रिलीज होणार सांड की आँख


तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांचा एक फोटो खेळ दिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हे दृश्य ‘सांड की आँख’ या आगामी चित्रपटात्या सेटवरील आहे. या चित्रपटाचे तुषार हिरानंदानी दिग्दर्शन करीत आहेत. या चित्रपटाची कथा वयाच्या साठीनंतर हातात रिव्हॉल्वर घेऊन अचूक निशाणा साधणाऱ्या शूटर दादींवर आधारित आहे. भूमी पेडणेकर चंद्रो तर तापसी पन्नू प्रकाशी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘रिव्हॉल्वर दादी’ म्हणून वय वर्षे ८६ असणाऱ्या चंद्रो तोमर गावात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नेमबाजीचे कौशल्य पाहिले की भलेभले तोंडात बोट टाकून त्यांच्याकडे बघत बसतात. नेमबाजीच्या २५ राष्ट्रीय स्पर्धा या आजींनी जिंकल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांत १०० हून अधिक पदके देखील जिंकली आहेत.


दुसऱ्या आजींच नाव प्रकाशी तोमर असे असून या चंद्रो तोमर यांच्या नणंद आहेत आणि त्यांचेही वय ८२ आहे. जेव्हा वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी रिव्हॉल्वर शूटींगला सुरूवात केली, तेव्हा अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. पण सर्वांकडे दुर्लक्ष करीत त्यांनी आपला निशाणा साधला आणि सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. अशा या जिगरबाज आज्जींची अफलातून गोष्ट आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत रिलीज होणार आहे.

Leave a Comment