यामुळे चर्चेत आले दिवंगत अभिनेेते फिरोज खान


दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने (DDCA) दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियमचे नाव बदलत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. हा नामकरण सोहळा १२ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. तसेच येथील एका स्टँडला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे देखील नाव देण्यात येणार आहे.


दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रजत शर्मा म्हणाले की, अरूण जेटली यांच्या प्रोत्साहानामुळेच विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशिष नेहरा, ऋषभ पंत आणि इतर खेळाडूंनी भारताचे नाव गौरवले.


तसेच, संघटनेने स्पष्ट केले आहे की, केवळ स्टेडिएमचे नाव बदलण्यात येणार असून फिरोजशाह कोटला ग्राउंड हे नाव कायम राहणार आहे.

संघटनेकडून ही घोषणा करताच, नेटीझन्सनी स्टेडियम आणि ग्राउंडबद्दल माहिती मिळवण्यासाठी गुगल करण्यास सुरूवात केली. कुतूहल आणि जिज्ञासावर काहीही इलाज नसतो. त्याप्रमाणे स्टेडियमच्या इतिहासाबद्दल काहीही माहिती नसलेल्यांना स्टेडियमचे नाव अभिनेता फिरोज खान यांच्या नावावरून ठेवले आहे असे वाटले. अनेकांनी गुगलवर फिरोज खान सर्च करण्यास देखील सुरूवात केली. फिरोज खान गुगल सर्चमध्ये ट्रेंडिग देखील होते. फिरोज शाह हा दिल्लीत तुघलक शासनकर्ता होता. त्याचाच नावाने स्टेडियमला नाव देण्यात आले होते.

Leave a Comment