अॅटम – सर्वात चिमुकला तरी पॉवरफुल 4 जी स्मार्टफोन


किकस्टार कंपनी युनिहर्त्झने जगातील सर्वात छोटा तरीही पॉवरफुल ४ जी स्मार्टफोन अॅटम या नावाने सादर केला आहे. या फोनची छबी लहान असली तरी काम महान आहे असा कंपनीचा दावा आहे. जगातील सर्वात मजबूत फोनमध्ये या फोनचा समावेश आहे. या फोनची बॉक्स पाहून आत नक्की काय दडलेय याचा अंदाज येणार नाही तर त्यासाठी बॉक्स उघडून तळहातावर मावेल एवढ्याच आकाराच्या या फोनचे काम पाहावे लागेल.

हा सर्वात छोट्या आकाराचा ४ जी फोन आहेच पण तो सर्वात छोट्या स्क्रीन प्रोटेक्टरसह दिला गेला आहे. फोनसोबत युएसबी टाईप सी, ५ वॉटचा चार्जर आणि हॅडकॅरी केबल आहे. हा फोन चार्जरपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा आहे. फोनचा लुक प्रीमियम आहे.

फोनला २.४५ इंची डिस्प्ले कोर्निग गोरील्ला ग्लास प्रोटेक्शनसह दिला गेला असून उजवीकडे युएसबी टाईप सी पोर्ट, त्यावर पुश टू टॉक बटण आहे. हे बटण दाबले कि फोन वॉकीटॉकी प्रमाणे वापरता येतो. त्याच्याचवर पॉवर लॉक अनलॉक असून या फोनला ड्युअल सीम सुविधा आहे. ३.५ एमएमचा ऑडीओ जॅक आहे.

फोनच्या रिअरला १६ एमपीचा फ्लॅश सह कॅमेरा तर ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. खाली होम बटण फिंगरप्रिंट सेन्सरसह असून फोनला टचस्क्रीन डिस्प्ले आहे. हा फोन वॉटर प्रुफ आहे. त्याला ४ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरी आणि अँड्राईड ८.१ ओरिओ ओएस दिली गेली आहे. फोनची किंमत आहे ३९८५० रुपये.

Leave a Comment