डिस्काऊंटमुळे या स्टोअरमध्ये तुफान हाणामारी


अमेरिकन रिटेल कंपनी कॉस्तकोचे चीनमधील पहिले स्टोर मंगळवारी सुरू करण्यात आले. मात्र पहिल्याच दिवशी विचित्र गोष्टींना सामोरे जावे लागले आहे. अनेक वस्तूंवर 60 टक्क्यांपेक्षा अधिक डिस्काउंट असल्याने स्टोर उघडण्याआधीच स्टोर बाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. लोक एवढी उतावळी झाली होती की, स्टोरचे शटर पुर्ण उघडलेले नसताना देखील, रांगत आतमध्ये शिरत होते. स्टोरच्या आत आणि बाहेर धक्काबुक्की सुरू झाल्यानंतर अखेर स्टोर बंद करावे लागले. परिस्थिती पाहता पोलिसांना बोलवावे लागले.

लोकांना सोशल मीडियावर सांगितले की, चेकआउट काउंटरवर दोन तास वाट पाहावी लागली. पार्किंगसाठी 3 तास वेटिंग होती. अनेकांनी ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी स्टोरपर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला.

कोस्तको मागील पाच वर्षांपासून चीनमध्ये ऑनलाइन सुरू आहे. मात्र पहिले स्टोर आता उघडले आहे. कोस्तकोने चीनमध्ये वर्षभराची मेंबरशिप केवळ 42 डॉलर ठेवली आहे. तर अमेरिकेत मेंबरशिप 60 डॉलर आहे.

अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर सुरू असतानाच कोस्तकोने शंघाईमध्ये स्टोर सुरू केले आहे. यावरून स्पष्ट होते की, अमेरिका कंपन्यांना ट्रेड वॉरशी काहीही देणेघेणे नाही.

अनेक रिटेल कंपन्यांनी चीनमधील आपला व्यवसाय बंद केला आहे. फ्रेंच कंपनी कारफोरने जूनमध्ये चीनच्या युनिटमधील 80 टक्के भागीदारी विकली आहे. यामुळेच कोस्तकोचा चीनमधील प्रवेश महत्त्वाचा आहे.

Leave a Comment