पाकिस्तीनी अभिनेत्री म्हणते आमची गाणी चोरतात बॉलिवूडवाले


पुन्हा एकदा भारतीय सिनेसृष्टीवर पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयात हिने निशाणा साधला आहे. पाकिस्तानची गाणी भारतीय सिनेसृष्टी चोरते, असा आरोप पाकिस्तानची महविश हयातने केला आहे. तिच्या पोकळ आरोपानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. त्याचबरोबर तिला पाकिस्तानी युजर्सनेही पाठिंबा दिला आहे.

तिने भारतीय अभिनेत्री आलिया भट्टचे एक गाणे ‘प्रादा’च्या संदर्भात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या व्हाईटल साईनचे गाणे ‘गोरे रंग’सोबत हे गाणे मिळते जुळते असल्याचे महविश हयातने म्हटले आहे. मला खूप आश्चर्य वाटत आहे. एकीकडे पाकिस्तानला खलनायक असल्याचे बॉलिवूड सांगते आणि दुसरीकडे आमचीच गाणी चोरतात. तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी, कॉपीराईट्स उल्लंघन आणि रॉयल्टी देत नसल्याचे महविश हयातने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


अभिनेता शाहरुख खानच्या नेटफ्लिक्स शो ‘बॉर्ड ऑफ ब्लड’वरही महविशने टीका केली. महविश म्हणाली, बऱ्याच दिवसांपासून मी सांगत आहे. बॉलिवूडने अजून एक पाकिस्तान विरोधी प्रोजेक्ट केला आहे. आता तरी आपण जागे होणार आणि समजून घेणार का? बॉलिवूडचा अजेंडा काय आहे? शाहरुख खान देशभक्त बना, यासाठी कोण तुम्हाला रोखणार नाही. पण आमची बदनामी करु नका.


काही दिवसांपूर्वीच महविशने एका लेखात म्हटले होते की, आपल्या देशातील चित्रपट उद्योगाला भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सशस्त्र केले आहे. पाकिस्तान एक मुस्लीम देश आहे आणि येथे फिल्म उद्योगात इस्लामोफोबिया आहे.

Leave a Comment