नुकताच बॉलीवूडचा हँडसम हंक अर्थात ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या बहुप्रतीक्षित ‘वॉर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये नेत्रदिपक स्टंट्स, वेगवान अॅक्शन आणि थरकाप उडवणारी दृश्ये यांचा भरणा दिसतो. ह्रतिक आणि टायगरची ऑनस्क्रिन केमेस्ट्री पाहण्यासारखी आहे.
‘वॉर’ हा चित्रपट ह्रतिक आणि टायगर श्रॉफ यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवण्यात यशस्वी झाल्याचे दिसते. ह्रतिक ‘सुपर थर्टी’ चित्रपटानंतर पुन्हा पहिल्या फॉर्ममध्ये आल्याचे दिसत आहे. ‘वॉर’ चित्रपटातील भव्यता आणि सुसाट वेग ह्रतिकच्या करियरला उंच शिखरावर पोहोचवेल अशी अपेक्षा त्याचे चाहते करु शकतात.
अॅक्शन आणि थरकाप उडवणाऱ्या ‘वॉर’चा ट्रेलर रिलीज
सिध्दार्थ आनंद यांनी ‘वॉर’ हा थरारपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होईल.