‘एटीएम वापरण्याआधी ‘ही’ गोष्ट नक्की तपासा’


तुम्हाला जर वारंवार एटीएमद्वारे पैसे काढायची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. आपण ज्या या एटीएम मशीनमधून पैसे काढत आहोत, ती मशीन सुरक्षित आहे का हे तपासणे गरजेचे आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर यांनी असाच एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे, यामध्ये एटीएम मशीनशी छेडछाड करण्यात आलेली असून, एटीएम मशीनवर एटीएम कार्ड स्कॅनर आणि पिनची माहिती मिळवण्यासाठी छुपा कॅमेरा लावण्यात आलेला आहे.


सांगण्यात येत आहे की, हे सफदारजंग, दिल्ली येथील कॅनरा बँकेचे एटीएम आहे. रोझी नावाच्या एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले की, तुमचे एटीएम क्लोन केले जाऊ शकते. या एटीएम मशीनमध्ये कॅमेरा आणि चीप लावण्यात आलेली आहे.

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर यांनी हा व्हिडीओ रिट्विट करत लिहिले की, एटीएम वापरण्याआधी या गोष्टी नक्की तपासा. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 60 हजार पेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे.


या व्हिडीओला उत्तर देताना कॅनरा बँकेने लिहिले की, बँकेने आपल्या ग्राहकांचे व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. आम्ही स्कॅनर असलेले एटीएम शोधून, त्यातील स्कॅनर काढले आहे. कोणत्याही ग्राहकाच्या डाटाबरोबर कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. तसेच बँकेने एका दिवसात 10 हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ओटीपा ऑथेंटिकेशन सुरू केले आहे.

Leave a Comment