तुम्हाला नक्कीच घायाळ करेल सई ताम्हणकरचा पैठणी लुक


नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ही कायम चर्चेत असते. ती कधी आपल्या आगामी चित्रपटांमुळे, तर कधी आपल्या हॉट फोटोशूटमुळे ती कायम चर्चेत असते. पण आता ती आपल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच एक पैठणी फोटोशूट नेहमीच बोल्ड फोटोमुळे सर्वाना चर्चेत राहणाऱ्या सईने केले. सध्या सोशल मीडियावर तिचा हा मराठमोळा लुक खूपच चर्चेत आहे. हातात बांगड्या, कपाळाला चंद्रकोर, केसांचा अंबाडा आणि त्यावर गुलाबाची फुले अशा मराठमोळ्या अवतारातील सईच्या या फोटोंनी सर्वांनाच घायाळ केलं आहे.

सईच्या सौंदर्यात पैठणातील हा राजेशाही लुक आणखीच भर घालत आहे. नाकातील नथ आणि इतर दागिने तिच्या मराठमोळ्या पेहरावाला साजेसे आहेत. कुणाचीही नजर लागेल असाच तिचा हा लुक आहे. सईने काही दिवसांपूर्वी बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर तिची खूप चर्चा झाली होती.

Leave a Comment