गर्मीपासून वाचण्यासाठी खरेदी करता येणार एअरकंडिशनर टी-शर्ट


आज तंत्रज्ञानाच्या जगात अनेक नवनवीन गोष्टींचा शोध लागत आहे. अनेक नवनवीन गोष्टीच्या शोधामुळे अनेकजण आश्चर्यचकित होतात. आता अशीच एक नवीन टेक्नोलॉजी तयार करण्यात आली आहे. आता तुम्हाला उन्हाळ्यात गर्मी वाटत असेल, तर काळजी करण्याचे काहीही कारण नाही. कारण आता टी-शर्टच्या आतच चक्क एअर-कंडिशनर लावता येणार आहे.

सोनीने हे डिव्हाइस तयार केले असून, ज्यामुळे तुम्ही एसी अथवा कुलर तुमच्या टी-शर्टमध्ये लावू शकणार आहात व तुम्हाला गर्मी देखील होणार नाही.

रिओन पॉकेट हे डिव्हाइस छोट्या पॉकिटाच्या आकाराचे आहे. टी-शर्टला मानेच्या ठिकाणी एक छोटेशी जागा असेल, तेथे हे डिव्हाइस लावता येणार आहे.

हे डिव्हाइस मोबाईलमधील अपच्या माध्यमातून चालणार असून, गर्मीमध्ये हे 13 डिग्री सेल्सियस तापमान कमी करू शकेल. तसेच थंडीमध्ये याच्या मदतीने तापमान 8 डिग्रीपर्यंत वाढवताही येते.

संपुर्ण चार्ज होण्यासाठी या डिव्हाइसला 2 तास लागतात. तर याची बॅटरी लाइफ 90 मिनिटे आहे. सध्या हे डिव्हाईस जापानमध्ये उपलब्ध असून, याची किंमत 120 डॉलर आहे.

Leave a Comment