अल्लू अर्जूनने विकत घेतली सर्वात महागडी रेंज रोव्हर


आपल्या लक्झरी गाड्यांच्या प्रेमासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन हा ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी त्याने रॉयल व्हॅनिटी व्हॅन फाल्कन विकत घेतली होती. त्यानंतर त्याची ही नवी कोरी व्हॅनिटी व्हॅन बरीच चर्चेत आली होती. अर्जुनने आता पुन्हा एकदा एक लक्झरी कार विकत घेतली आहे.


जगातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक रेंज रोव्हर अर्जुनने विकत घेतली. इन्स्टाग्रामवर गाडीचा फोटो पोस्ट करत त्याने याबद्दलची माहिती दिली. इन्स्टाग्रामवर त्याने फोटो पोस्ट करत म्हटले की, मी जेव्हाही काही विकत घेतो तेव्हा मी आभार प्रदर्शित करतो.

View this post on Instagram

It’s Sexy & I Love it 🖤 #AAFALCON

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline) on


हे रेंज रोव्हरचे लेटेस्ट मॉडेल असून अर्जुनने या गाडीला 2.3 कोटी रुपये देऊन विकत घेतली आहे. हैदराबाद पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनला दंड भरायला सांगितले होते. अर्जुनविरुद्ध मोहम्मद अब्दुल आजम नावाच्या व्यक्तिने तक्रार केली होती. या तक्रारीत म्हटले होते की, अर्जुनची व्हॅनिटी व्हॅनच्या काचा या टिंटेड होत्या. यानंतर अर्जुनला दंड भरावा लागला होता. अल्लू अर्जुन याआधीही त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमुळे चर्चेत आला होता.


ही व्हॅन भारत बेंझ चेसिसवर तयार केली गेली आहे. असे म्हटले जाते की, यावर तयार केलेल्या गाड्या या अधिक काळ चालतात. या व्हॅनिटी व्हॅनचेही अनेक फोटो अल्लूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या तो त्रिविक्रम चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.